‘लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी’
सरस्वती शैक्षणीक सांस्कृतिक विकास मंडळ विवरे संचलित, सरस्वती इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये दिनांक 01/08/ 2022 रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली .
निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- लोकमान्यय टिळक यांच्या पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शाळेचे प्रशासक श्री महेंद्र दयाराम पाटील ,शाळेच्या सचिव सौ संगीता महेंद्र पाटील आणि शाळेचे पर्यवेक्षक मिलिंद दोडके, शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” असे इंग्रजांना अतिशय धाडसाने आणि आत्मविश्वासाने सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच लोकमान्य टिळक. लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत.टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना ‘भारतीय अशांततेचे जनक’ म्हणून संबोधले आणि टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना 6 वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली.
मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला.
देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले.
बाळ गंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते.
भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे १ ऑगस्ट १९२० रोजी आजारपणामुळे निधन झाले
शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून विविध उदाहरणांसह बाळ गंगाधर टिळक यांचे जीवनप्रसंग सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नितीन सराफ आणि कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शिक्षक नरेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
हे वाचलंय का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






