धक्कादायक ; तीन सख्ख्या बहिणींचा एकत्र गळफास, मध्यरात्री मुली अंधरुणात नाही म्हणून आईने…

Spread the love

एकत्र जेवण, मध्यरात्री मुली अंधरुणात नाही म्हणून आईने घरामागे बघितलं, तीन मुली झाडाला गळफास घेतलेल्या पाहिल्या, एकच टाहो

Uttar Pradesh Big News: तिन्ही बहिणींनी घराच्या मागील बाजूस असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अखेर कोणत्या कारणांमुळे त्यांनी आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं, याबाबत सध्यातरी माहिती नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोणीही काहीही म्हटलं नाही किंवा कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट नाही. तरीही या तीन बहिणींनी एवढे मोठे पाऊल उचलणे हे अत्यंत धक्कादायक आहे.

भोपाळ :- मध्य प्रदेशातील खंडवा येथे तीन सख्ख्या बहिणींनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटाघाट गावात राहणाऱ्या तीन बहिणींची नावे सोनू, सावित्री आणि ललिता अशी असल्याची माहिती आहे. या घटनेबाबत जव्हार पोलीस स्टेशनचे प्रभारी शिव राम जाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री डायल १०० ला माहिती मिळाली की, कोटाघाट गावात एकाच कुटुंबातील सख्ख्या बहिणींनी झाडाला गळफास लावून घेतला आहे.

या घटनेची माहिती मिळताच जव्हार पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह पिपलोद पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कुटुंबीयांनी तिन्ही बहिणींचे मृतदेह झाडावरून खाली काढले होते. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.

तिन्ही बहिणींनी घराच्या मागील बाजूस असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अखेर कोणत्या कारणांमुळे त्यांनी आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं, याबाबत सध्यातरी माहिती नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोणीही काहीही म्हटलं नाही किंवा कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट नाही. तरीही या तीन बहिणींनी एवढे मोठे पाऊल उचलणे हे अत्यंत धक्कादायक आहे.

आठ भावंडांचे संपूर्ण कुटुंब, त्यापैकी दोन बहिणींचे लग्न झाले होते. सोनू ही तीन मृत बहिणींमध्ये मोठी होती. मंगळवारी तिन्ही बहिणी मोटारसायकलवरून बाजारात गेल्या होत्या आणि त्यांनी बाजारातून नवीन दोरीही आणली होती. कुटुंबीयांना याचे कारण विचारले असता त्यांनी कारण सांगण्यास नकार दिला.

मंगळवारी रात्री जेवण करून सर्व बहिणी झोपायला गेल्या. मात्र, रात्री तिन्ही बहिणी अंथरुणावर न दिसल्याने आईने त्यांचा शोध घेतला. तेव्हा घराच्या मागील बाजूस असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला तिन्ही बहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. यानंतर कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. त्यानंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले आणि त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तिन्ही बहिणींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सध्या जव्हार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा : –

टीम झुंजार