संत गाडगे बाबा बेघर निवारा केंद्राला मिळाला हक्काचा डॉक्टर

Spread the love

प्रतिनिधी । सुमित पाटील वावडदा
जळगांव- शहरातील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र येथे परवा जळगाव जिल्हा पोलीस दलातील मनोज सुरवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेथील व्यवस्थापन मंडळासह गरजू निराधारांनी डॉक्टर व औषधांची कमतरता बोलून दाखविली, यावेळी मनोज सुरवाडे यांनी त्यांच्या या कमतरतेला प्रतिसाद देत डॉक्टर आणि औषधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले होते.

याच अनुषंगाने मनोज सुरवाडे यांनी आज डॉक्टर बोलवून सर्व निराधारांची आरोग्य तपासणी करत त्यांना औषधी डॉक्टर हे कायमस्वरूपी त्यांच्या सेवेसाठी हजर राहतील असे सांगितले. सदर उपक्रमासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संपर्कप्रमुख कुणाल मोरे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. तसेच केलेल्या कार्याबद्दल मनोज सुरवाडे, कुणाल मोरे यांचे व्यवस्थापन मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

प्रसंगी मनोज सुरवाडे, कुणाल मोरे यांच्यासह उद्योजक संदीप बोरोडे, डॉ.प्रसाद साटम, चेतन निंबोळकर, गणेश पाटील, व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक दिपक चौधरी उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार