एरंडोल नगरपालिकेत नागरिकांची आढावा बैठक “हर घर तिरंगा” अभियान यशस्वी करण्याबाबत चर्चा

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल :- येथील नगरपालिका हॉल मध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्याबाबत एरंडोल शहरातील गणेश मंडळ, सामाजिक संस्था, विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी, महिला मंडळ, पत्रकार, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर्स, उद्योजक यांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आलेली होती.
या आढावा बैठकीसाठी एरडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे, माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, म. नगरसेविका सौ. जयश्री पाटील, नरेंद्र पाटील, प्रसाद दंडवते,नरेश डागा, भास्कर जोगी. विवेक ठाकूर, गणेश महाजन, धूत बी. के.पत्रकार संजय चौधरी,माजी नगरसेवक जहीरोदीन कासम रविद्र शांताराम महाजन, अशोक चौधरी, शिवाजी अहिरराव, शालीग्राम गायकवाड,जावेद मुजावर, ओम पाटील, ज्ञानेश्वर महाजन, कैलास महाजन आदीस नगरपालिकाचे कार्यालय अधिक्षक हितेश जोगी. डॉ. अजित भट, देवेंद्र शिंदे, डॉ. योगेश सुकटे आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

एरडोल नगरपालिका मार्फत स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा उपक्रम दि 13 ते15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविला जाणार आहे. त्यानिमित्त एरंडोल शहरातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय व निमशासकीय खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूतीने करण्यासाठी एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी आवाहन केले आहे.

एरंडोल नगरपालिका मार्फत दि. 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात शहरातील सर्व शाळा, सामाजिक संस्था, राजकीय संस्था, व्यापारी संस्था यांचे सहकार्य घेऊन भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बचत मेळावा, विविध स्पर्धा यात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच हर घर तिरंगा फडकविण्यासाठी नगरपालिका मार्फत तिरंगा स्टॉल लावण्यात
येणार आहे या स्टॉलवर सशुल्क देऊन शहरातील नागरीकांनी तिरंगा खरेदी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.

टीम झुंजार