धुळे हादरलं! पत्नीने फोन केला म्हणून घरी येण्यासाठी निघाला, पण रस्त्यातच तिघांनी गोळीबार करत तरुणाचा खून

Spread the love

धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चिनू पोपली या ३९ वर्षे तरुणाचा तीन अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.,दोघा संशयितांना अटक, तपास सुरु

धुळे :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चिनू पोपली या ३९ वर्षे तरुणाचा तीन अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या हत्येचे कारण समजताच पोलिसही चक्रावले आहेत. पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून एक जण फरार आहे.

धुळे शहरातील कुमार नगर भागात चिनू पोपली हा त्याच्या कुटुंबासह राहत होता. तो रात्री घरी नसताना त्याच्या घरी आलेल्या दोघा जणांनी त्याच्या पत्नीला तो कुठे आहे याबाबत विचारणा केली. त्यांनी चिनू बाहेर गेल्याचे सांगितले. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून निघून गेले. त्यानंतर पत्नीने घरी आलेल्या दोघांबाबत चिनू पोपली यांना माहिती दिली.

पत्नीच्या फोननंतर काही वेळातच चिनू पोपली घराजवळ आल्यानंतर ते तिघेजण परत आले. तेव्हा त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. पण हा छोटासा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी थेट आपल्याजवळील बंदूक काढून चिनू पोपली यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर जखमी अवस्थेत चिनू हा घरी आला व त्याने आपल्या पत्नीला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

चिनू पोपली यांचा अवघ्या ३,४०० रुपयांच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलिसांनी यासीन पठाण आणि भटू चौधरी या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एक जण फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

नेमकं काय घडलंं?

शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेनंतर आता पोलिसांकडून हत्याप्रकरणाचा कसून तपास केला जातो आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पवन नावाच्या व्यक्तीने या हत्येबाबत माहिती दिली आहे. पवन हा हत्या झाली तेव्हा घटनास्थळी होता. त्याने ही संपूर्ण घटना पाहिली असून या हत्याकांडाच्या घटनाक्रमाबाबत त्याने सविस्तर माहिती पोलिसांनी दिलीय.

आधी बाचाबाची झाली. मग मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर देसी कट्टा काढला आणि गोळी झाडून चिनूचा खून केला. या नंतर जखमी झालेल्या चिनूला घेऊन आम्ही सिव्हिल रुग्णालयात गेलो. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती पवनने दिलीये.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार