दुर्दैवी घटना : जेवण एकत्र, अभ्यास एकत्र, फिरायचे एकत्र अन् मृत्यूही एकत्रच! २ जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत…

Spread the love

औरंगाबाद :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच औरंगाबादमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक जिवलग मित्र असतोच. अशाच एका मैत्रीची घटना औरंगाबाद मधून समोर आली आहे. कायम सोबत असलेल्या दोन मित्रांनी आपला जीव गमवावा लागला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

दोघे मित्रांना उच्चशिक्षण घेऊन अधिकारी व्हायचे होते. याचे स्वप्न उराशी बांधून दोघे जिवलग मित्र गाव सोडून औरंगाबाद शहरा साठी दुचाकीवर निघाले होते. मात्र औरंगाबाद-पुणे महामार्गावरील भेंडाळाफाट्याजवळ त्यांचा भीषण अपघात झाला. आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

आदित्य रामनाथ सुंब वय -२० (रा. मांजरी, ता. गंगापूर), यश (नयन) भाऊसाहेब शेंगुळे वय -२० वर्षे, (रा. जयसिंगनगर, गंगापूर) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दोन्ही जिवलग मित्रांची नावे आहेत. लहानपणीच्या जिवलग मित्रांच्या अपघाताची वार्ता गावात पोहोचताच संपूर्ण गावात एकच शोककळा पसरली. (बुधवार) सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोघेही (एम.एच. २० ई.एक्स ६०४८) या दुचाकीवरून औरंगाबाद येथे कॉलेजला जात होते.


दरम्यान, भेंडाळा फाट्याजवळ नाशिक येथुन हैद्राबादला जाणारा ट्रक (के.ए. ५६.४१२३ ) हा रस्त्यावर उभा होता. अचानक समोर ट्रक उभा पाहून दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी उभ्या ट्रकला धडकली. अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकींचा चिमुरडा उडाला आहे. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गंगापूर व मांजरी गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिकेत चालक व नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले.

आदित्य आणि यश हे दोघे हि बालपणीचे खास मित्र, कुठेही जायचे असले तर सोबत, काही करायचे असले तर सोबतच, अभ्यास देखील करायचा तर सोबतच ते दोघे काहीही करायचे ते सोबतच. दोघांनी उच्च शिक्षण घेण्याचे ठरविले आणि औरंगाबाद इथे भाड्याने खोली घेऊन राहू लागले. दरम्यान ते सामान घेऊन औरंगाबदमध्ये निघाले होते. मात्र, नियतीच्या मनामध्ये काहीतरी भलतंच होतं. खोलीत जाण्या अगोदरच दोघांचे आकस्मित निधन झाले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार