पूर्णा प्रतिनिधी :-कोरोनोची तिसरीला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत तर 15 ते 18 वयोगटातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण महत्त्वाचे असून हे लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार नितीश कुमार यांनी केले आहे.
दिनांक 13 जानेवारी रोजी पूर्णा शहरातील गट साधन केंद्र पूर्ण शहरातील व तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सर्वप्रथम गटशिक्षणाधिकारी कापशीकर यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेच्या आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती सादर केली त्यानंतर बोलताना नितीश कुमार यांनी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे याला शासन स्तरावर प्राधान्य दिले जात असून पूर्णा शहरांमध्ये असलेल्या विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची लसीकरण महत्त्वाचे आहे यासाठी प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये मुख्याध्यापकांनी सतर्क राहिले .
पाहिजे लसीकरण करून प्रत्येक शाळा ही पुढे आली पाहिजे यासाठी पूर्ण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने प्रत्येक शाळेला आरोग्य विभागाच्या वतीने कर्मचारी लसीकरणासाठी दिले जातील परंतु पूर्णा शहर व तालुक्यामध्ये 100% लसीकरण करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षकांची प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले या बैठकीला मुख्याध्यापक सय्यद सर विविध शाळांचे शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.