महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून गरजू 600 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वितरण

Spread the love

सामाजिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात पत्रकार संघाचे मोठे योगदान – महापौर जयश्री महाजन

जळगाव | पत्रकार म्हणजे समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातला मोठा दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते. बातमीच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वसामान्यांना मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रमाणात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. पत्रकारांची संघटना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक मदत देऊ शकते ही मोठी अभिमानाची बाब असून उल्लेखनीय कार्य आहे असे प्रतिपादन महापौर सौ.जयश्री महाजन यांनी आज दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे पत्रकारांच्या पाल्यांना व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पत्रकार संघाकडून गोरगरिबांना शैक्षणिक आधार देण्याचा प्रयत्न- आ. राजुमामा भोळे

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये पत्रकार संघाकडून विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला जातो याचा मी स्वतः साक्षीदार असून पत्रकार संघाच्या सामाजिक कार्यात जे काही सहकार्य लागलं ते आम्ही करीत राहू गोरगरिबांना शैक्षणिक आधार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून होतो आहे, हे कौतुकवास्पद आहे. असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले आहे.

सहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

एकूण सहाशे विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग कंपास पेटी, पाणी बॉटल, पेन्सिल किट व लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन उद्योजक सागर चौबे, मंगळग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले,

जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्री. राजपूत करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रविण पाटील,उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी गणेश वळवी, जैन उद्योग समूहाचे मीडिया विभाग प्रमुख अनिल जोशी,पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे,खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी मान्यवर उपस्थित होते.शालेय साहित्य वाटापा करिता जैन उद्योग समूहाने वह्या उपलब्ध करून दिल्या तर समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूषण महाजन यांनी तर सूत्रसंचालन कमलेश देवरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद कुळकर्णी, दीपक सपकाळे,गोपाळ सोनवणे, विजय गाढे, संजय चौधरी, प्रमोद सोनवणे, महेंद्र सूर्यवंशी, विनोद कोळी,रोहन पाटील, चेतन निंबोळकर यांनी सहकार्य केले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार