झुंजार । प्रतिनिधी वर्धा:- जिल्ह्यात सतत तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून हजारो एक्कर शेतपिक पाण्याखाली गेलेले असून ज्या प्रमाणे पीक विमा काढण्यासाठी कृषिविभाग,महसुल विभागाकडून वेळोवेळी प्रसिध्दी व मार्गदर्शन केले जाते.त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता गावागावात जाऊन नुकसान झाल्यापासून 72 तासाचे आत पिकविमा कंपनीकडे क्लेम करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होताना दिसून येत नाही.
ह्या प्रकारामुळे शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना जरी राबविल्या जात असल्या तरी योजना राबविणारी प्रशासकीय यंत्रणा मात्र ढिसाळ दिसून येत असल्यामुळे पीक विमा काढूनही शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करणे जरुरी असल्याचे मत जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान होऊन त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना सुरू केली.
मागील वर्षी 2021 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला परंतु नुकसान झाल्यापासून 72 तासाचे आत विमा कंपनीकडे तक्रार केली नाही. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून प्रत्येक गावात कृषी सहाय्यक कार्यरत असताना त्यांनी गावात जाऊन 72 तासाचे आत पिकविमा कंपनीकडे नोंदणी करिता शेतकऱ्यांना कळवावे असे रेवतकर यांनी भेटी दरम्यान सांगितले आहे.जेणे करून जिल्ह्यातील कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






