‘बांगर माझा ढाण्या वाघ, तिकडे राहून एक-एक आमदार पाठवत होता’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच गुपित फोडलं

Spread the love

आरे म्हटला तर कारे करु, कानाखाली आवाज काढू, आमच्या नादी लागू नका, संतोष बांगरांची पुन्हा धमकी

हिंगोलीत आज आमदार संतोष बांगरांच्या वतीने कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेत बांगरांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळी संतोष बांगरांचा ‘बाहुबली अवतार’ पाहायला मिळाला. यावेळी परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना चक्क क्रेनने हार घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी झालेल्या सभेत संतोष बांगर आणि एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषणे ठोकत ठाकरे गटावर हल्ला चढवला.

हिंगोली : –. “आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका”, अशी जाहीर धमकी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना दिली. परवा इकडे काही लोकांनी सभा सभा घेतली… ती काय सभा होती का… सभा कशाला म्हणतात, असं म्हणत समोरील गर्दीकडे त्यांनी बोट दाखवताच उपस्थित शिंदे गटातील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला.

हिंगोलीत आज आमदार संतोष बांगरांच्या वतीने कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेत बांगरांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळी संतोष बांगरांचा ‘बाहुबली अवतार’ पाहायला मिळाला. यावेळी परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना चक्क क्रेनने हार घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी झालेल्या सभेत संतोष बांगर आणि एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषणे ठोकत ठाकरे गटावर हल्ला चढवला.

“आपल्याला डिवचण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका. आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका”, अशी धमकी संतष बांगरांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना दिली.

संतोष बांगर बाळासाहेबांचा ढाण्या वाघ- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील गांधी चौक येथे आयोजित सभेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांचे तोंडभरून कौतुक केले. संतोष बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. तिकडे राहून एक-एक आमदार पाठवत होता, असं पहिल्यांदाच थेटपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी गुपित फोडलं.

विरोधकांना आपण आपल्या कार्यातून उत्तर देणार आहोत. मी जिथे जातोय तिथे हजारोंच्या संख्येने नागरिक सत्कार करण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्वप्नातलं हे सरकार आहे. अडीच वर्षांपूर्वीच हे सरकार स्थापन व्हायला होतं. शिवसेना भाजपा युतीसाठी जनतेने भरभरून मतदान दिलं होतं, सेना भाजप युतीचे सरकार येईल ही जनतेची अपेक्षा होती. ज्या लोकांना बाळासाहेबांनी कधी जवळ उभं केलं नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं हे दुर्दैवी आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम करतोय, हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय. मग आमचं काय चुकतंय?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.

हर.. हर.. महादेव! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी संतोष बांगर निघाले शिवभक्तांसह कावड यात्रेत

हिंगोली : कळमनुरी येथील चिंचाळेश्वर मंदिर ते कयाधू अमृतधारा मंदिर हिंगोलीपर्यंत काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेचे कळमनुरीहून प्रस्थान झाले आहे. हजारो शिवभक्तांनी हर.. हर.. महादेव असा गजर करीत यात सहभाग घेतला आहे.

आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वात काढण्यात येत असलेल्या या कावड यात्रेची मागील सात ते आठ वर्षांची परंपरा आहे. या कावड यात्रेत हजारो भाविक व युवक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. श्रावण महिन्यात कावड यात्रा काढण्याची जुनी परंपरा आहे. विविध भागातून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तथा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा येथील नागनाथाच्या दर्शनासाठी कावड घेऊन येणाऱ्या भाविकांची मांदियाळी पहायला मिळते. मात्र बांगर यांनी चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते कयाधू अमृतधारा मंदिर हिंगोली ही परंपरा सुरू केली अन् त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

कळमनुरी येथून दुपारी निघालेल्या या कावड यात्रेत कळमनुरी, हिंगोली, औंढ्यासह विविध भागातून आलेले शिवभक्त हजारोंच्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत. २० ते २२ किलोमीटरचा हा पायी प्रवास आहे. या प्रवासादरम्यान कावड घेऊन हे भाविक हर.. हर.. महादेवचा जयघोष करून आसमान निनादून टाकत असल्याचे पहायला मिळत होते. भगवे झेंडे, टी शर्ट यामुळे तर या यात्रेचे वातावरण भारावून गेले होते. हजारोंचा हा जनसमुदाय बम बम बम भोले.. भोले… च्या तालावरही थिरकत होता.

मुख्यमंत्री येणार असल्याने वेगळा जल्लोष

या कावड यात्रेतील मोठ्या जनसमुदायामुळे राष्ट्रीय महामार्गाचा एक रस्ताच पूर्णपणे व्यापला होता. मुख्यमंत्री येणार असल्याने या यात्रेत वेगळा जल्लोष पहायला मिळाला. राजकीयदृष्ट्याही आ.संतोष बांगर हे मुख्यमंत्री गटात गेल्यानंतर त्यांचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार