जळगावमध्ये तरुणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली असून तरुणाची हत्या की आत्महत्या यामुळे पोलिसांमध्ये शंका आहे. या घटनेचा तपास सुरू असून कुटुंबाचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
जळगाव : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच नशिराबाद गावाजवळील कडगाव फाट्याजवळ भादली येथील तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. संदेश लिलाधर आढाळे (वय-२२) रा. डोंगरकठोरा. ता. यावल ह.मु. भादली ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदेश लिलाधर आढाळे हा तरूण आई-वडीलांसह भादली इथे वास्तव्याला होता. जळगावात एका खासगी फायनान्स कंपनीत तो कामाला होता. संदेशचे वडील खासगी वाहन चालक असून ते नाशिक इथे राहतात. संदेश हा रात्री घराबाहेर पडला पण परत घरी आला नाही.
शेतकऱ्यांना बुधवारी सकाळी संदेशचा मृतदेह नशिराबाद पोलीस हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळील शेतात आढळून आला. घटनेची माहिती बदली येथील पोलीस पाटील डॉ. राधिका ढाके यांनी नशिराबाद पोलिसांना दिली. त्यानुसार, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संदेश याच्या पोटावर आणि डोक्यावर वार केल्याच्या जखमा असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीस उपाधीक्षक कुमार चिंता यांनीही घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. शेवटचे वृत्त आत्या आले तोपर्यंत घटनेचा पंचनामा करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






