एरंडोल प्रतिनिधी :- प्रकाश शिरोडे
एरंडोल :- दि-११.१.२२ रोजी राष्ट्रीय महामार्ग नं ६ वर फिल्टर प्लांट एरंडोल जवळ भिषण अपघात झाला त्यात २ व्यक्ती मृत्युमुखी पडले, त्याच ठिकाणी उड्डाण पुलाचे काम दिरंगाईने सुरू आहे , तेथे रात्री साठी कुठल्याही पथदिव्यांची सोय नसल्याने वारंवार लहान-मोठे अपघात होत असतात तरी त्या क्षेत्रात “पथदिवे आणि अपघाती-क्षेत्र फलक” यांची सोय करण्यात यावी व उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासनाने योग्य ती भूमिका घ्यावी व संबंधित आस्थापनांमध्ये योग्य तो पाठपुरावा करावा व अपघातांच्या समस्येचे निराकरण करावे अश्या मागण्यांसाठी आज मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे एरंडोलच्या तहसीलदार श्रीमती.सुचिता चव्हाण व पोलीस निरीक्षक झानेश्वर जाधव यांना निवेदन देण्यात आले.