रक्षाबंदनाच्या दिवशी सर्पदंशाने युवकांच्या मृत्यू! फार्मा कंपनीत नोकरीचे स्वप्न राहिले अपूर्ण-

Spread the love

लोहारा ता पाचोरा :- येथे शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या पंचवीस वर्षीय युवकाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना ऐन रक्षाबंधनच्या दिवशी घडली.या दुःखद घटनेने लोहारा गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येथील सुधीर वेडू शेळके यांचा मोठा मुलगा निलेश(वय-२५)हा गावानजीक असलेल्या शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी आज सकाळी एकटाच गेलेला होता.

मात्र चारा टाकताना आपल्याला विंचू चावला असं सांगत तो पायी चालत घरी पोहोचला .मात्र असं सांगत असतांनाच निलेशच्या तोंडातून फेस निघू लागल्याने कुटुंबीय घाबरले. त्याला विंचू नाही तर सर्पदंश झाल्याची शंका त्यांना आली.त्यामुळे तात्काळ त्यांनी त्याला जळगांव ला वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले मात्र सर्पदंश होऊन बराच कालावधी होऊन गेल्याने विष शरीरात पसरले.अखेर प्रयत्न निश्फळ ठरले नियतीने दुःख देत निलेशची प्राणज्योत मालवली.

निलेश हा अत्यंत शांत,संयमी व अभ्यासू मुलगा होता.त्याने बी.फार्मसी चे शिक्षण पूर्ण केले असून तो गोव्यातील एका फार्मा कंपनीत नोकरीला होता मात्र तेथील वातावरण ऍडजस्ट होत नसल्याने तो काही दिवसांपूर्वीच घरी आलेला होता. तर त्याने नुकतीच ऑनलाईन मुलाखत दिली होती व अहमदाबाद येथे एका फार्मा कंपनीत जॉईनिग साठी जायचे नियोजन होते

याबाबत त्याने मित्रांनाही सांगितले होते मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होते.त्याचे नवीन कंपनीत जायचं स्वप्नं अपूर्णच राहिले.
ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी अत्यंत दुःखद घटना घडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.निलेशवर सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार