आरोग्य आपली खरी संपदा , व्यसना पासुन दूर रहा – प्रीती पाटील मॅडम
पिंप्री – प्रतिनिधी
धरणगाव ( पिंप्री खु ) :- आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंप्री येथे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने – मोबाईलचे दुष्परिणाम व आपले आरोग्य विषयावर कार्यशाळा संपन्न झाली . तत्पुपूर्वी प्रीती पाटील मॅडम ( आरोग्य समुपदेशक) यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना व्यसनमुक्ती ची शपथ देत युवक व आपण व्यसन पासून दूर राहीलं पाहिजे , आज आपलं आरोग्य जोपासना केली पाहिजे यावर प्रकाश टाकला . व विद्यार्थ्यांना दररोज आपल्या सवयी कश्या असाव्यात यावर माहिती दिली .

दुसऱ्या सत्रात आरोग्य शिबीर सम्पन्न झाले या वेळी विद्यार्थ्यांना सकस आहार , आपल्या सवयी , दैनिक आहार कसा असावा , मानसिक ताण , मोबाईल चे दुष्परिणाम , आपले आयुष्य सुरळीत होण्यासाठी आपल्याला योग्य त्या सवयी लावाव्या लागतील असे प्रतिपादन केले
विद्यार्थ्यांना फलक वापर करत अन्न साखळी दर्शित करत संकल्पना स्पस्ट केल्या व विविध शंका निरसन केल्या.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ व्ही एम चौधरी , उपशिक्षक एस के शिंदे ,शरीफ पटेल , सचिन पवार , जितेंद्र पाटील , सॊ मनीषा पाटील ,तर माध्यमिक विभागाचे विजय साळवे , सॊ भावना भट , दीपिका पाटील , शिक्षकेतर कर्मचारी सौरभ देसले ,सुदर्शन चव्हाण , अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन आर एस पाटील सर यांनी केले तर आभार आर आर पावरा सर यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






