म्हसावद :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित राष्ट्राचा इतिहास गावाचा इतिहास या कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे यांच्या प्रतिमापूजनाने झाली.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस के भंगाळे सर व श्री के पी पाटील सर होते.
प्रमुख वक्ते जुनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री योगराज चिंचोरे सर व शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण सर त्याचप्रमाणे प्राचार्य श्री एस बी सोनार सर ,उपप्राचार्य श्री जी डी बच्छाव सर ,सौ वंदना पाटील मॅडम ,श्री एस एम नेतकर सर, सौ विद्या चव्हाण मॅडम आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. श्री सचिन चव्हाण सर यांनी आपल्या भाषणातून म्हसावद या गावाची उत्पत्ती कशी झाली हे पुराण काळातील अध्यात्मिक आणि पौराणिक संदर्भ देऊन समजावले .ग्रामपंचायतीची स्थापना गावातील पहिले सरपंच यांचीही माहिती दिली त्याचप्रमाणे छोटे छोटे उदाहरण देऊन गावाचा इतिहास मुलांसमोर मांडला. श्री योगराज चिंचोरे सर यांनी आपल्या भाषणातून गावाचा राजकीय सामाजिक सांस्कृतिक इतिहास सादर केला त्याचप्रमाणे जुन्या काळातील गावातील नवयुवक मंडळ त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्य तसेच वारकरी संप्रदाय अनेक जुन्या लोकांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला.
अध्यक्षीय भाषणातून श्री एस के भंगाळे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे मोल काय असते स्वातंत्र्य म्हणजे काय त्याचप्रमाणे म्हसावद गावाची माहिती त्यांनी दिली.श्री के पी पाटील सर यांनी राष्ट्राचा इतिहास गावाचा इतिहास तसेच खानदेशातील नंदुरबारचा शिरीष कुमार यांच्या अंगी असलेले नेतृत्व गुण आणि स्वातंत्र्यासाठी त्याने दिलेले बलिदान याविषयी माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस एम पिंगळे सर आणि आभार प्रदर्शन श्री व्ही आर मोरे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी अनमोल असे सहकार्य केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घरघर तिरंगा आयोजित राष्ट्राचा इतिहास गावाचा इतिहास हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
राष्ट्राचा इतिहास गावाचा इतिहास दिनांक 11/08/2022 रोजीचा कार्यक्रम नैसर्गिक बाबी पाहता दिनांक 12/082022 रोजी घेण्यात आला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






