एरंडोल येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी.

Spread the love

प्रतिनिधी । एरंडोल:- येथे राजमाता जिजाऊ महिला मंडळ, जिजाऊ ब्रिगेड, राजे संभाजी पाटील सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा संघटना शिवछत्रपती मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ओम नगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांना वंदना करून सुरू करण्यात आली.

शहरातील विविध महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा शिंदे, सारिका पाटील, सुरेखा पाटील, स्वाती पाटील, शोभना साळी, संध्या महाजन, क्षमा साळी, शालिनी कोठावदे, चंद्रकला जैन, आरती ठाकूर, पूजा साळी, गौरी मानुधने, मीनाक्षी पाटील, देशपांडे मॅडम, यांचेसह अनेक महिला मंडळाकडून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.यावेळी अनेक महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याला उजाळा दिला.

यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक विकास नवाळे, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा मनोज पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, राजेंद्र चौधरी, भाजपा माजी तालुकाध्यक्ष एस आर पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, जेष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, नगरसेवक अभिजीत पाटील, प्राचार्य एन ए पाटील, डॉ. राजेंद्र देसले, रोहिदास पाटील, डॉ. प्रशांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन मोहन चव्हाण, आर एस पाटील, के डी पाटील स्वप्निल सावंत, राकेश पाटील, समाधान पाटील, राज पाटील यांचेसह अनेक शिवप्रेमी नागरिक व महिला यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन संध्या महाजन यांनी केले.दरम्यान राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यासाठी शहरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रावर माहिती दिली तर काही महिलांनी पोवाडे व कविता चे वाचन केले व जिजाऊ च्या पराक्रमाची माहिती सांगितली.

टीम झुंजार