कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोळगाव ता.भडगाव येथे शासनाच्या आदेशानुसार “स्वातंत्र्याचा महोत्सव” या उपक्रमांतर्गत “स्वराज्य महोत्सव” आयोजित करण्यात आला असून दररोज विविध उपक्रम राबविले जात आहे,आज रोजी प्रा.प्रशांत पाटील यांचे “मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम” या महत्वपुर्ण विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,
आपल्या व्याख्यानात मोबाईलमुळे मणुष्याचे संपूर्ण जीवनच बदलत जात असून,शारिरिक तथा मानसिक स्वास्थ्य आपण गमावत आहोत,भ्रमणध्वनीच्या अतिवापराने मणुष्य आत्मविश्वास गमावून परावलंबी होत जात असल्याचे प्रतिपादन आपल्या व्याख्यानाद्वारे स्पष्ट केले,उपस्थित श्रोतृवर्गास त्यांनी गरजेपुरता मोबाईल वापरण्याचे आवाहन केले.
सदर व्याख्यानास विद्यार्थी-विद्यार्थीनी तथा शिक्षक वर्ग आवर्जून उपस्थित होता. प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मुख्य ऊपस्थितीत तसेच पर्यवेक्षक अनिल पवार तथा कार्यवाहक प्रा.रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी विद्यालय तथा महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






