कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे शासनाच्या आदेशानुसार “स्वातंत्र्याचा महोत्सव” या उपक्रमांतर्गत “स्वराज्य महोत्सव” आयोजित करण्यात आला असून दररोज विविध उपक्रम राबविले जात आहे,आज रोजी “रांगोळी स्पर्धा” विद्यार्थीनी तथा विद्यार्थी यांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेत प्रथमस्थान कु.सरोज कैलास पाटील,द्वितीयस्थान कु.प्रियंका अजबराव सोनवणे तर तृतीयस्थान चि.वेदांत नितीन अमृतकर यांनी प्राविण्य मिळवले.
प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मुख्य ऊपस्थितीत तसेच पर्यवेक्षक अनिल पवार तथा कार्यवाहक प्रा.रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “रांगोळी स्पर्धा” पार पडली.
सदर उपक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विशेषतः महिला शिक्षिका प्रा.माया मराठे,प्रा.सोनाली सोनवणे,प्रा.प्रविणा पाटील,प्रा.प्रतिभा केदार,प्रा.मनीषा बोरसे आदि तथा इतर सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






