मुंबई : – शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे. अखेर त्यांनी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने डाव्या बाजून धडक दिली. ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि आम्हाला फरपटत नेलं असं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे. त्यानंतर मी पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही. तब्बल एका तासानंतर आम्हाला मदत मिळाली असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे.
मराठा आरक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने गेली अनेक वर्षे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून योगदान दिले होते. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली असून, “मराठा आरक्षणासाठी नेटाने झगडणारा नेता अचानक गेला” अशा शब्दांत भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
त्याचबरोबर मराठा समाजासाठी झगडणारा नेता गेला पण आता त्यांच्या मागे मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘धक्कादायक बातमी’
दरम्यान, एबीपी माझाशी बोलताना भाजप नेते विनोद तावडे यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, विनायक मेटेंचं निधन ही धक्कादायक बातमी आहे. त्यांच्यासारखा नेता जाणं हे धक्कादायक आहे. मराठी शेतकरी, शेतमजूर यांना न्याय देणारे मेटे नेते होते. त्यांचं अशावेळी जाणं खूप धक्कादायक आहे. आम्ही एकत्र काम केलं. समाजाला न्याय मिळवून देण्यात ते अतिशय अग्रेसर होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.