अपघातात मयत झालेल्यांच्या वारसांना एस बीआय बँकेची दहा लाखाची मदत.

Spread the love

प्रतिनिधी । एरंडोल

एरंडोल :- येथील रहिवासी असलेले नितीन उत्तम जयस्वाल यांनी एसबीआय शाखा एरंडोल येथे अपघाती विमा 500 रुपये भरून काढला होता. दरम्यान काही महिन्यापूर्वी त्यांचे अपघाती निधन झाले सदरील विम्याचे संरक्षण हे 10 लाख रुपये असल्याने स्थानिक एरंडोल एसबीआय शाखेचे शाखा व्यवस्थापक आशीष मेढे यांनी वारसदारांची संपर्क साधून त्यांना आवश्यक कागदपत्रे आणि पाठपुरावा केल्याने हा विमा मंजूर झाला असून एक मध्यमवर्गीय कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावल्यानंतर आर्थिक हातभार लावण्यास उपयोगी ठरला आहे.

सदर रक्कम वारसदारांच्या पत्नी खुशबू नितीन जयस्वाल यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.यावेळी अपघातामध्ये मयत झालेले नितीन जयस्वाल यांचे मोठे बंधू संदीप जयस्वाल, पत्नी खुशबू जयस्वाल व त्यांचा मुलगा व मुलगी यांचेसह सहाय्यक प्रबंधक मुकेश दलाल, क्षेत्रीय प्रबंधक सौरव पाटील,शाखा व्यवस्थापक अनुराधा नंदनवार, लेखापाल आशिक सोनवणे, एसबीआय जनरल इन्शुरन्स चे कर्मचारी राहुल कदम, सचिन वैद्य, व इतर सर्व बँकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होतेदरम्यान यावेळी सहाय्यक प्रबंधक मुकेश दलाल यांनी सांगितले की एसबीआय मधील खाते धारकांनी बँकेचा 500 किंवा 1हजार रुपयाचा अपघाती विमा करून घ्यावा बँक खातेदाराचे काही कमी-जास्त झाल्यास त्याच्या वारसांना याचा फायदा होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबातील मुलांचे शिक्षण, लग्न, यासाठी याची मदत होते असे सांगितले.मयताची पत्नी खुशबू जयस्वाल यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले व मिळालेल्या या पैशांमुळे माझ्या मुलांचे शिक्षण पूर्ण होईलअसे सांगितले.

टीम झुंजार