- त्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे काल प्रथमच जळगावात आले होते. त्यांच्या मतदारसंघातील धरणगाव येथे गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले होते.
- गुलाबराव पाटलांनी जनतेची माफी मागावी, जळगावातले शिवसैनिक आक्रमक; महापुरुषांच्या पुतळ्याचं केलं शुद्धीकरण
- काल गुलाबराव पाटलांकडून अभिवादन, आज शिवसैनिकांकडून दुग्धाभिषेक करून महापुरूषांच्या पुतळ्यांचे शुद्धीकरण.
धरणगाव :- शिवसेनेसोबत बंडखोरी करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संविधानाची पायमल्ली केली आहे. त्यामुळे त्यांना महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी जनतेची माफी मागायला हवी, अशा संतप्त भावना जळगावातील शिवसैनिकांनी (Jalgaon Shivsainik) व्यक्त केल्या आहेत. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी भव्य कार रॅली काढून आपल्या धरणगाव मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पुष्पहार अर्पण केले होते.

तसेच शिवसेना आणि आपल्या विरोधकांना टोलेही लगावले होते. आज धरणगावातील निष्ठावान शिवसैनिकांनी या गोष्टीला आक्षेप घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करत त्यांचे शुद्धीकरण (Purification) केले.



धरणगावमध्ये काल शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी अभिवादन केलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे शिवसैनिकांनी (Shiv Sena) आज दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले आहे. गद्दारांचा महापुरुषांच्या पुतळ्यास स्पर्श झाल्याने शिवसैनिकांनी महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुद्धीकरण केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
गुलाबराव वाघ काय म्हणाले ?
गुलाबराव वाघ म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेर यांनी करोनाच्या काळात चांगलं काम केलं. त्यामुळे संपूर्ण जगभरातून उद्धव ठाकरे यांचं कुौतुक केलं, सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन कौतुक केलं. परंतु, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून 40 जणांनी गद्दारी केली. गद्दारी करणाऱ्यांमध्ये काही मंत्री होते, आताही त्यातील काही मंत्री झालेत. मग गद्दीरी करून त्यांनी काय मिळवलं? गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. पण गेल्या दोन महिन्यांपासून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची पायमल्ली होत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी निष्ठावंत मावळ्यांच्या सहकार्याने स्वराज्य उभा केलं. परंतु, या गद्दारांनी आपली निष्ठा विकली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. “
जोरदार घोषणाबाजी
जळगावात शिवसैनिक गुलाबराव पाटलांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. गुलाबराव पाटील काल जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला हजर होते. या शक्तीप्रदर्शनानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला होता. याचवरून येथील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. गुलाबराव पाटील गद्दार आहेत. अशा बेईमान आणि संविधान पायदळी तुडवणाऱ्यांचा निषेध असो, असे म्हणत शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
टीका नाही मात्र विरोधकांना लगावला होता टोला
आपल्या स्वागताला आलेली गर्दी ही जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत, असे काल गुलाबराव पाटील म्हणाले होते. मंत्री झाल्यावर पहिल्यांदा आलो आहे. गेली अनेक वर्षे लोकांची कामे केली. आज कोणावर काही बोलणार नाही. कोणाला उत्तर आज देण्याचा विषय नाही. जनता माझ्यासोबत आहे. गुलाबराव संपला म्हणणाऱ्यांनी हे पाहावे, असा टोला काल त्यांनी शिवसैनिकांना लगावला होता. यावरून आता आगामी काळात गुलाबराव आणि शिवसैनिक यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याचे दिसत आहे.





हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






