Independence Day News : देशभरात स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे ध्वजारोहन सुरू असताना एका महिलेने थेट आत्मदहन करण्यात प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
जळगाव : – संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात व्यस्त असताना जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात जामनेरच्या एका महिलेने स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न आत्मदहनाचा प्रयत्न आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. वंदना सुनील पाटील असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या महिलेच्या आणि तिच्या पतीच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. पण कारवाई होत नसल्याने वंदना पाटील आणि त्यांचे पती गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
प्रशासन त्यांच्या मागणीची दखल घेत नसल्याने महिलेने आज जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गुलाबराव पाटील हे ध्वजारोहण करत असताना आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच या महिलेन स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच धावपळ उडाली. परंतू यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच या महिलेला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नेले आहे पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.