प्रतिनिधी । (रवी देसाई)
दौंड : दौंड येथील जामीअह मखजनुल ऊलुम येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पुण्यातील उद्योजक जतीन्दर सिंह जुनेजा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. सदरच्या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमासाठी लोकसेवा सोशल फाउंडेशनचे संचालक सलीम पटेकरी, अविश्री बालसदनचे अध्यक्ष अनिल कटारिया, शिवसेनेचे युवा नेते अनिल पळसे, अमोल जगताप, ॲड. अनिल कांबळे तसेच परिसरातीलमान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे प्रमुख हाफीज हारून शेख यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला तर सलीम पटेकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना रोख स्वरुपात पारितोषिक तसेच सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. दरम्यान, गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे : 12 वी : पठाण लिबिया कौसर फिरोज, शेख मुस्कान सलीम, शेख सिद्दीका जहीर, मेहता अक्षद जितेश, कु. चव्हाण वैष्णवी आनंद, सदावर्ते नामदेव महादेव, कु. सोनवणे सृष्टी शाम. 10 वी : हंनुरे अफ्फान मंजूर अहमद, सय्यद रेहाना अकबर, सय्यद अक्सा मुद्दसिर, शेख झाइनाब सिकंदर, शेख नुझत कमारुझामा, खान रुकईय्या अब्दुल, गफार, कु. सोनवणे तेजल शिवाजी, कु. जानगवळी अपूर्वा सुरेश. सदर कार्यक्रमाचे आयोजन हाफीज हारून शेख व कार्यकारी मंडळ जामीअह मखजनु उलुम यांच्यावतीने करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार प्रदर्शन दिनेश पवार यांनी केले होते. तसेच कुरकुंभ येथील अविश्री बालसदनामध्ये देखील स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरस्वती पूजन व अविश्रीचे संस्थापक दिवंगत श्रीमल कटारिया व अतुल कटारिया यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नानविज येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक सोमनाथ वसंत वाघ यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. तद्नंतर राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीत गाऊन सलामी देण्यात आली.
कार्यक्रमामध्ये अविश्री बालसदनचे अध्यक्ष अनिल कटारिया यांनी अविश्री बालसदनाच्या कार्याचा आढावा घेऊन अनाथ मुलांना या ठिकाणी कसे सांभाळले जाते, तसेच त्यांच्यावर योग्य संस्कार करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहतील, असे तयार केले जात असल्याची माहिती यावेळी त्यांनी मान्यवरांना दिली. संस्थेतर्फे मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अविश्री बालसदनातील मुलांनी विविध नृत्यामधून विविध कलाविष्कार मान्यवरांपुढे सादर करून उत्कृष्ट दाद मिळविली. याप्रसंगी हाफीज हारून शेख, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निगडे यांनी मनोगत व्यक्त करून अध्यक्षीय भाषण पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निगडे, पोलीस उपनिरीक्षक राज राजपूत, पोलीस प्रशिक्षक नीलेश थोरात उद्योजक एस. पी. शितोळे, डॉ. बचुटे, शिवसेनेचे युवा नेते अमोल जगताप, पोलीस पाटील शक्तीजित पाटील, सेवा निवृत्त सैनिक मेजर पाटणकर, शिलाताई वाघमारे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायक्रमाचे नियोजन अविश्री बालसदनाच्या प्रमुख राजक्का निगडे, पंकज कटारिया व त्यांच्या सहकार्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध व्याख्याते दिनेश पवार यांनी केले होते.

आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






