पहा हा Video :शिंदे गटातील आ. संतोष बांगरांनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात .

Spread the love

हिंगोली : – शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. आता तर एका उपहारगहाची पाहणी करीत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर यांचा पारा चढला आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावली. त्यामुळे पुन्हा आ. बांगर हे चर्चेत आले आहेत.

आता कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्याची जबाबदारी ही खासगी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदारांकडून कामगारांना खाण्यायोग्यही अन्न दिले जात नाही. हिंगोली जिल्ह्यातील एका उपहारगृहाला बांगर यांनी भेट दिली असती तेथील प्रकार उघडकीस आला आहे. मध्यान्ह भोजनात आळ्या आणि माशा पडलेल्या त्यांच्या निदर्शनास आले. एवढेच नाही तर प्रत्येक गोष्टीची त्यांनी पाहणी केली.

याबाबत उपहारगृहाच्या व्यवस्थापकास विचारणा केली असता हे चुकून झाले, येथून पुढे होणार नाही असे म्हणताच बांगर यांनी त्याच्या कानशिलात लगावली.संबंधित कंत्राटदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूचा कोणताही अवलंब न करता जेवण कामगारांना दिले जात होते. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी आमदार बांगर यांनी केली आहे.

कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असून यामधून आर्थिक स्वार्थ साधला जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची चौकशी करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी बांगर यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिवाय संबंधित कंत्राटाला हे काम मिळालेच कसे याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

हे वाचलंत का ?


टीम झुंजार