जळगाव (प्रतिनिधी ) – केसरीराज लाईव्ह प्रस्तुत आणि निर्माते भगवान सोनार अभिनित ‘सावन नि बरसात उनिये तु फिराला चाल मनि सोनीऐ’ हे अहिराणी गीत १४ ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आले असून खान्देशातील प्रेक्षकांच्या ते मोठ्या प्रमाणात पसंतीला उतरत आहे. हे अहिराणी गीताला सोशल मीडियाच्या
माध्यमातून मोठी पसंती मिळत आहे.
खान्देशातील गावागावात या गाण्याची चर्चा असल्याने आगामी गणेशोत्सव , नवरात्र , वाढदिवस आणि लग्न कार्यांमध्ये हे गाणे प्रचंड वाजविले जाऊन रसिक यावर थिरकून मोठ्या प्रमाणात आनंद घेतील असा विश्वास निर्माते आणि अभिनेते भगवान सोनार यांनी बोलून दाखविला . तसेच या गाण्याला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून येत्या काही दिवसांत आणखी नाविन्यपूर्ण अहिराणी गाण्याची निर्मिती करणार असल्याचा मनोदय भगवान
सोनार यांनी व्यक्त केला.
या गाण्याचे चित्रीकरण खान्देशातील एका निसर्गरम्य स्थळी करण्यात आले. या गाण्याचे गीतकार , गायक आणि कंपोझर अण्णा सुरवाडे असून गीताला विलास वाघ यांनी संगीत दिले आहे. ड्रिम म्युझिक स्टुडिओ येथे या गाण्याचे रेकॉर्डिंग प्रमोद महाजन यांनी केले आहे. या गाण्यात सहकलाकार म्हणून रूपेश बनसोडे, प्रज्ञा ढिवरे, श्रुति ढिवरे या कलाकारांनी साथ दिली आहे.
गाण्याचे नृत्यदिग्दर्शक कुणाल थेटे ,डिओपी किरण चौधरी , एडिटर बाळू वाघ,पोस्टर डिझाईन विजय काकडे यांनी केले आहे .
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे, पोलीस दलातील गायक , कलाकार संघपाल तायडे परेश हाॅलिडे रिसाॅर्ट कंडारी, प्रविण मोतीसिंग साबळे गोद्री ,उधार जिंदगी प्रॉडक्शन, यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. उमेश देशपांडे, विकास पाटील, संदिप जाधव, सोनम पाटील, रुपेश बनसोडे, किरण चौधरी, अमोल खरात आदी चॅनलच्या टीमने आपले सहकार्य दिले आहे.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.