नागदुली शिवारातील डी पी (रोहीत्र) मधून काँपर वायर व आईलची चोरी

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी :- प्रकाश शिरोडे
एरंडोल :- नागदुली शिवारातील निरज बाळकृष्ण अग्रवाल यांचे शेत गट नं 54 मधील शेतात असलेली 25KB डी पी (रोहीत्र) मधून 1 एम एम ची 10 किलो काँपर वायर व 70 लिटर आईलची चोरी झाल्याची घटना घडली
या बाबत सविस्तर माहिती अशी की
आज दिनांक 13/1/2022 रोजी दुपारी 4.00 वा च्या सुमारास बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ कमलेश राजु पाटील हे शेतातील लाईट का बंद आहे हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना नागदुली शिवारातील निरज बाळकृष्ण अग्रवाल यांचे शेत गट नं 54 मधील शेतात असलेली 25KB डी पी (रोहीत्र) त्याचा कोड नं DRN /LI1115 DRN/6720 असुन खाली जमिनीवर पडलेली आहे असे दिसले म्हणून त्यांनी तात्काळ लक्ष्मी गुंडा माने सहाय्यक अभियंता एरंडोल ग्रामीण यांना माहिती दिली.
लक्ष्मी माने आपले कर्मचारी स्टाफ दिपक भगवान साळुखे, दिपक गोपाळ माळी, योगेश आत्माराम महाजन असे आम्ही सर्व सदर ठिकाणी जाउन पाहीले असता रोहीत्र ही जमिनीवर पडलेली होती सदर रोहीत्राचे LT रॉड, बुर्शीग, Hाटेबल कोअर असे जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले व रोहीत्र मधील आईल दिसले नाही सदर रोहीत्रची पाहणी करता रोहीत्र मधील कापर कॉईल व आईल हे चोरीस गेले आहे.
35000/-रु कि ची कापर कॉईल गोल आकाराची 1MM मापाची 3कोअर मध्ये असलेली 10 किलो वजनाची जुवा 2)7000/- रु कि चे रोहीत्र चे आईल 70 लिटर अंदाजे असे एकूण 42000/-रु. किंमत आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन मध्ये लक्ष्मी गुंडा माने वय 26 धंदा- नोकरी (सहाय्यक अभियंता एरंडोल ग्रामीण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एरंडोल पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश पाटील,काशिनाथ पाटील पुढील तपास करीत आहे.

टीम झुंजार