मोठी बातमी : गोंदियाजवळ रेल्वे गाडीला भीषण अपघात ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी

Spread the love

गोंदिया : – रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या
‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीला गोंदिया शहराजवळ अपघात झाला आहे. पुढे जात असलेल्या मालगाडीला ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाला असून अपघातात ५० पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

मालगाडीला धडक दिल्यानंतर ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीचा एक डब्बा रुळाखाली घसरला. ही घटना आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. रेल्वे गाडीने अचानक दिलेल्या धडकेनंतर प्रवासी जखमी झाले असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसंच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोंदियात नेमकी काय घडली घटना?

भगत की कोठी ही एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेने जात होती. गोंदिया शहराच्या पाच किलोमीटर आधी रेल्वे पोहचली असता या रेल्वेने एका मालगाडीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर या ट्रेनचा एक डबा घसरला. या अपघातात ५० जण जखमी झाले. यापैकी १३ जणांच्या जखमा जास्त आहेत तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. या सगळ्या प्रवाशांवर खासगी आणि जिल्हा प्रशासन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वेचा वेग जास्त नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत तसंच बचाव कार्य सुरू केलं.

रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या “भगत की कोठी” एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात झाला आहे. समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर रेल्वेचा एक डबा रुळावरून खाली घसरला आहे. या अपघातात 50 पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाश्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार