गोपीचंद पुना पाटील, महाविद्यालयात “स्वातंत्र्याचा संग्राम” यावर बाळकृष्ण जडे यांचे व्याख्यान संपन्न.

Spread the love

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे शासनाच्या आदेशानुसार “स्वातंत्र्याचा महोत्सव” या उपक्रमांतर्गत “स्वराज्य महोत्सव” आयोजित करण्यात आला असून दररोज विविध उपक्रम राबविले जात आहे,

आज रोजी व्याख्याता वक्ता बाळकृष्ण जडे यांचे “स्वातंत्र्याचा संग्राम” या महत्वपुर्ण विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,आपल्या व्याख्यानात १८५७ नंतरच्या घडामोडी विशेषतः ब्रिटिशांविरुध्द भारतीयांनी दिलेला लढा,सावरकर,टिळक,चाफेकर बंधु,चंद्रशेखर आझाद,भगतसिंग,सुखदेव,राजगुरु,नाना पाटील,मदनलाल धिंग्रा आदिंनी देशाला स्वातंत्र्य मिळऊन दिलेले योगदान आपल्या व्याख्यानाद्वारे स्पष्ट केले,उपस्थित श्रोतृवर्गास त्यांनी ह्या सर्व महान व्यक्तीमत्वांनी केलेल्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असून त्यांना अभिप्रेत असलेल्या भारताचे नागरिक म्हणून जगण्याचे आवाहन केले.

सदर व्याख्यानास विद्यार्थी-विद्यार्थीनी तथा शिक्षक वर्ग आवर्जून उपस्थित होता.
प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मुख्य ऊपस्थितीत तसेच पर्यवेक्षक अनिल पवार तथा क.म.कार्यवाहक प्रा.रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला,सदर कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रा.मनोज पवार यांनी केले,तर सुत्रसंचलन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी विद्यालय तथा महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

टीम झुंजार