औरंगाबाद :- सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरात आलेल्या तरुणीचा एका युट्युब चॅनलच्या पत्रकाराने एका खून केल्याची घटना समोर आलीय. यानंतर खुनी पत्रकाराने औरंगाबाद ग्रामीणमधील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात खुनाची कबूल दिली. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
अंकिता असे या तरुणीचे नाव असून ती जालना जिल्ह्यातली आहे. ती एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये आलेली होती. मात्र, एका युट्युब चॅनलच्या पत्रकाराने या तरुणीचा खून केला. तसेच यानंतर खुनी पत्रकाराने पोलीस ठाण्यात जाऊन आणि पत्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुपवर याबाबक माहिती पाठवून खुनाची कबुली दिली आहे. आरोपी खुनी पत्रकाराने औरंगाबाद ग्रामीणमधील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात खुनाची कबूल दिली.
या दोघांची एंगेजमेंट झाली असल्याची चर्चा आहे. मात्र, याबद्दल सविस्तर माहिती आलेली नाही. तर हा खून प्रेम प्रकरणातून झाला असावा, अशी शंका शेजारी आणि आजूबाजूला राहणारे नागरिक व्यक्त करत आहेत. खून झालेल्या तरुणीचा आणि आरोपी तरुणाचा सोबत असलेला फोटो या दोघांची चांगलीच जवळील असल्याचे सांगून जातो.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






