पर्यावरण व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रमोद काकडे व माधुरी काकडे या दाम्पत्यास समाजरत्न पुरस्कार

Spread the love

दौंड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त वुई पुणेकर या संस्थेच्यावतीने मागील दोन वर्षांप्रमाणेच या वर्षीही सार्वजनिक जीवनात विशेष कार्य केल्याबद्दल विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान समाजरत्न पुरस्कार 2022 देऊन करण्यात आला. मिलिंद वडनेरे, प्रमोद काकडे, सचिन डेंग, पॉवेल बोलोयांग्व्ह यांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी तर माधुरी काकडे यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी या सर्वांना समाजरत्न पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात आले.

We Punekar’s या संस्थेने हा कार्यक्रम पुणे येथील भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या टाटा हॉलमध्ये आयोजित केला होता आयोजित केला होता. यावेळी डी. वाय. पाटील संस्थेचे पी. डी. पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू संजीव सोनवणे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, जलतज्ज्ञ राज देशमुख, पराग मते, सुकुमार सरदेशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

तुम्ही ज्या विचाराचे आहात त्या विचाराच्या लोकांपेक्षाही जे तुमच्या विचारांचे नाहीत, त्यांना तुमच्याबद्दल काय वाटतं त्यावर तुमची प्रतिमा अवलंबून असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी केले. शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयामध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून केल्या पंधरा वर्षापासून प्रमोद काकडे हे विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबवतात.

यामध्ये वही बांधणी कार्यशाळा, शाडू माती गणपती बनवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा, फटाके विरहित सामाजिक जाणीवांची दिवाळी आदी उपक्रमांसाठी प्रमोद काकडे यांना हा समाजरत्न पुरस्कार 2022 पुरस्कार देण्यात आला तर साहित्य क्षेत्रामध्ये मधुसिंधू काव्यप्रकार निर्मिती, मधुदीप काव्यप्रकार निर्मिती, सृष्टीकाव्य हा पर्यावरणावर आधारित काव्यसंग्रह, नाट्यलेखन, गझल, हायकु कादंबरी आदी लेखनासाठी माधुरी काकडे यांना समाजरत्न पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले.

समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमोद काकडे आणि माधुरी काकडे यांचे अभिनंदन भीमथडी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रशालेचे अधिकारी व शिक्षक शिक्षकेतर वृंदांनी केले.

टीम झुंजार