अमृत महोत्सव होताच हुतात्मा स्मारकाचा वीज पुरवठा खंडित….

Spread the love

सोयगाव, दि.१७
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि स्वराज्य महोत्सव होताच महावितरणने जोडणी केलेला हुतात्मा स्मारकाच्या वास्तूचा वीज पुरवठा बुधवारी खंडित केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे,त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचा भावना कागदावरच दिसून येत आहे.
जरंडी ता सोयगाव येथील हुतात्मा विश्वनाथ कालिदास राजहंस यांचे कोट्यवधी रु खर्चून भव्य स्मारक उभारले आहे

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ताबा असलेल्या या वास्तूचा थकबाकी अभावी तब्बल वीस वर्षांपासून वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता इतकेच काय तर अज्ञातांनी या स्मारकाचे वीज मीटर ही लांबविले आहे परंतु यंदाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना शासनाने या हुतात्मा स्मारकाचा वीज पुरवठा तातडीने जोडणी करण्याचे आदेश महावितरणला बजावले होते त्यामुळे दि.१३ आगस्ट सायंकाळी महावितरण च्या वीज कर्मचाऱ्यांनी या स्मारकाचा वीज पुरवठा सुरळीत केला

परंतु अमृत महोत्सव होताच बुधवारी सायंकाळी पुन्हा वीज पुरवठा खंडित केल्याने ही हुतात्मा स्मारकाची वास्तू अंधारात चाचपडत पडली आहे त्यामुळे शासनाला हुतात्म्यांचा प्रति केवळ कागदोपत्री आदर असल्याचे या प्रकारवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान महावितरण च्या वीज मंडळाने आमच्याकडे या वास्तूचा कायमस्वरूपी वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे कोणतेही आदेश नसल्याचे सांगून बुधवारी या वास्तुच वीज पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे जरंडीच्या स्मारकाचा नशिबी पुन्हा अंधार आला आहे.

रमेश जसवंत -तहसीलदार सोयगाव कोट :- महावितरणच्या वीज मंडळाला जरंडीच्या हुतात्मा स्मारकाची वीज जोडणी करण्यात यावी असे थेट पत्रच देण्यात आले होते या स्मारकाचा कोणत्याही सबबीवर वीज पुरवठा खंडित करू नये असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे चौकट- लेखी आदेध देऊनही महावितरणच्या वीज मंडळाने जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशाला खो देऊन बुधवारी स्मारकाचा वीज पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे ग्रामस्थांचे संतप्त भावना झाल्या असून या स्मारकाचा वीज देयके कोण भरणार असे मत व्यक्त करून महावितरण ने वीज पुरवठा खंडित केला आहे

छायाचित्र ओळ–स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला चकाकणारे हुतात्मा स्मारक दोनच दिवसात अंधारात

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार