झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- तालुक्यातील विखरण चोरटक्की गाव परिसर सह चोरटक्की जंगलामधील शेजारील ज्यांची शेती आहे. अशा 81 शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे म्हणून 15 हजार रुपयांच्या साहित्य मंजूर साहित्य अद्याप मिळाले नाही ते त्वरित मिळावे इ टेंडर चा वेळकाढू पण टाळावा.. वनरोपांच्या नर्सरीला ज्याप्रमाणे टिकाऊ कंपाउंड करून देतात तसे पक्के टिकाऊ कंपाउंड करून द्यावे
तसेच विखरन परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून जायबंदी झालेले 2 शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेली मदत रक्कम त्वरित अदा करावी या मागण्यांसाठी एरंडोल तालुका किसान सभा तर्फे कामगार नेते काँ अमृत महाजन किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष हिम्मत महाजन, राज्य समिती सदस्य का दिलीप चौधरी तालुका अध्यक्ष गंभीर महाजन नेतृत्वाखाली म्हसावद नाका जवळून यावल वनविभाग कार्यालयावर शेतकऱ्यांच्या धडक मोर्चा 16ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा काढण्यात आला वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे यांनी शेतकऱ्यांच्या निवेदन स्वीकारले
आणि 31 ऑगस्ट 2022 पर्यंत त्यांचे चार गावातील ज्या शेतकऱ्यांची शेती चोरटक्की जंगलाला लागूनच आहे अशा 81शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल उर्वरित शेतकरी यांचे ही प्रस्ताव पाठवू दुसऱ्या लॉटमध्ये त्यांचाही विचार होईल तसेच पक्के कुंपण बाबत भावना कळवू असे ठोस शासन दिले.. तेव्हा 31 ऑगस्ट22 पर्यंत मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा अमृत महाजन यांनी मोर्चा नंतर आटोपलेल्या शेतकऱ्यांच्या दीर्घ चाललेल्या बैठकित चर्चेअंती दिला आहे तसेच या भागातील ग्रामपंचायतींनी शेतीतील पिकांची वाढ झाली असून
आता जंगली श्वापदे निलगाई, रानडुक्कर ,हरणी, यांचा उपद्रव वाढत चालला आहे म्हणून वनक्षेत्र हद्दीत पक्के तार कंपाउंड करावे यासाठी ठराव करावे त तसे आवाहन केले या मोर्चात रामचंद्र महाजन, रघुनाथ पाटील, आत्माराम अहिरे, रघुनाथ महाजन, भीमराव पाटील, आनंदा शिंदे ,प्रेमराज चौधरी, आत्माराम अहिरे, सोपान मिस्त्री, काशिनाथ पाटील, वामन पवार, धोंडू महाजन, तुळशीराम महाजन, दिलीप महाजन, शांताराम महाजन ,आर पाटील भीमराव पाटील पुरुषोत्तम महाजन, आ दि त्रस्त आणि संतप्त शेतकऱ्यांचा सहभाग होता.
चौकट
शेतकऱ्यांच्या संतप्त भावना..
निवेदन देताना हे शेतकरी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना धार्यावर धरत होती आम्ही ज्यावेळेला संपूर्ण बरबाद हो उ त्याला तुम्ही आम्हाला मदत करणार का? अशा तऱ्हेचे भावना बोलून दाखवत होते एरंडोल पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश अहिरे हवालदार अनिल पाटील जुबेर खाटीक मिलिंद कुमावत मंगलसिंग पाटील आदीं चा चोख बंदोबस्त होता
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






