जालना : – सध्या महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे साप बाहेर येणं साहजिक आहे अशिच एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे गावाकडे नाग निघालाय हे वाक्य देखील दिवसभर चर्चेचा विषय असतो. कोणाच्या घरी निघाला, शेतात निघाला की आणखी कुठे आढळून आला. मग, त्याला पकडायला कोणी सर्पमित्र आला होता का, तो साप निघून गेली की कोणाला चावला, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा पाळीव प्राण्यांसोबत या नागांची नजरानजर होत असते. जालन्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. चक्क दावणीला बांधलेल्या बैलासमोर फणा काढून नाग उभारला होता. हे दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दावणीला बांधलेल्या एका बैलासमोर सलग 20 मिनिटे फणा काढून नागाने बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दावणीला बांधलेला बैल जराही या नागाला न घाबरता मोठ्या तोऱ्यात टाईटच उभा राहिला. समोर फणा काढून डौलत असलेल्या नागाचा जराही या बैलावर परिणाम झाला नाही. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे ही घटना घडली. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केली आहे.
पहा व्हिडिओ :
अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील शेतकरी सोनाजी जाधव यांच्या शेतातील बखारीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बैलाला बांधण्यात आलं होतं. या ठिकाणी बैल चारा खात असताना बैलासमोर अचानक पाच फूट लांब असलेला नाग आला आणि फणा काढून तब्बल 20 मिनिटे उभा राहिला. त्याने बैलाला घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला. पण, बैल जराही डगमगला नाही. ही बातमी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांपर्यंत गेली आणि बघता बघता रस्त्यावर गर्दी झाली.
पण कुणीही नागाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला नाही. सगळे शांत उभे राहून नाग आणि बैलामधील हे बघाबघीचं युद्ध पाहू लागले. अखेरीस, नागाने माघार घेत तेथून धूम ठोकली आणि उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी बैलाचे कौतुक करत सुटकेचा निश्वास टाकला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






