सोयगाव, दि.१८
७५ ,व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवच्या आठवणी यंदाच्या वर्षात कायम आठवणीत राहव्या यासाठी सोयगाव तहसिल च्या एका कर्मचाऱ्याने थेट शरीरावर गोंदण करून आठवणी तेवत ठेवून उजाळा देण्याचे काम केले असून यावरून या २४ वर्षीय तरुणांच्या देशभक्ती चा प्रत्यय आला आहे या तरुण कर्मचाऱ्याने हातावर,दंडावर आणि तळ हातावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे भारताचे क्षण चित्र कोरून ठेवले आहे
त्यामुळे तालुका भर हा चर्चेचा विषय ठरला आहे
सचिन ओहोळ असे या २४ वर्षीय तरुणाचे नाव असून सीयगव तहसिल कार्यालयात तो निवडणूक विभागात संगणक परिचालक म्हणून काम करतो त्याने तळ हातावर हर घर तिरंगा,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आदी स्लोगण कोरीव करून ठेवले असून हाताच्या दंडावर थेट तिरंगा कोरीव काम केले आहे
त्याच्या या देशाच्या प्रति भक्तीचा तालुका भर गौरव केल्या जात असून अमृत महोत्सवी वर्षाच्या आठवणी वर्षभर तेवत ठेवण्याचा या तरुणाचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे
चौकट—शरीराच्या विविध भागावर या तरुणाने विविध स्लोगण कोरून ठेवले असून हाताच्या दंडापासून ते तळ हातापर्यंत या तरुणांची जाज्वल्य देशभक्ती दिसून येत आहे

छायाचित्र ओळ-,हातावर चक्क गोंदण करून जतन केल्या आठवणी





