जळगावात पोलिसांचा लॉजवर छापा, १३ जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत; मुली म्हणाल्या, आम्ही तर…

Spread the love

Jalgaon Crime News : जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर पोलिसांनी आज धाड टाकली होती. यावेळी लॉजवर तब्बल १३ जोडपी पोलिसांना आक्षेपार्ह अवस्थेत आढळली.

हायलाइट्स:

  • जळगावात दोन लॉजवर पोलिसांचे छापे

  • १३ जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत सापडली

  • लॉजमालक आणि दलालही ताब्यात

जळगाव : – शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले. अशातच आज शहरातील एमआयडीसी परिसरातील दोन लॉजिंगवर गुरुवारी पोलिसांनी छापा टाकला. या लॉजवर मुला मुलींची १३ जोडपी सापडली आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान लॉज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र छापेमारी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींनी आपण तर आपल्या मर्जीने इथे आलो, असा दावा केला आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली होती. यावेळी लॉजवर १३ युगुलं पोलिसांना सापडली. जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजवर अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने गुरुवारी संबंधित लॉजवर छापा टाकला.

संग्रहित छायाचित्र , pic for Google.

ताब्यातील मुलींमध्ये कॉलेजवयीन तरुणी

धाडसत्रात एका ठिकाणी तीन मुली व तीन मुले, तर दुसऱ्या ठिकाणी ९ मुली व ९ मुलं आढळून आली. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत तर काही मुली परप्रांतीय आहेत. त्या जळगावात स्थायिक झालेल्या आहेत.

स्वतःच्या मर्जीने आलो, मुलींचा दावा

एका ठिकाणी दलालाच्या माध्यमातून मुली पुरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. आपण आपल्या मर्जीने आल्याचे या मुलींनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तोपर्यंत या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार