Breaking News : Video, बोरीवलीत चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भिती!

Spread the love

मुंबई :- मुंबईत पाऊस थांबलेला असताना मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. बोरिवलीमध्ये चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीमध्ये १२ ते १५ फ्लॅट होते अशी माहिती मिळत आहे. बोरीवलीमधील चार मजली साईबाबा नगरमधील गितांजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना बोरिवलीत दुपारी चार मजली इमारत कोसळली. बोरिवली पश्चिमेला असलेल्या साईबाबा नगरातील ही इमारत आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. साईबाबा मंदिराजवळ असलेली गीतांजली ही चार मजली इमारत अचानक कोसळली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि पोलीस पथक दाखल झाले आहे. दुपारी पाऊणच्या सुमारास अग्निशमन दलाने दुर्घटनेचा स्तर दोन असल्याचे जाहीर केले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का? याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही.

बोरिवलीतील इमारत कोसळतानाचा व्हिडीओ…

या इमारतीचा मोठा भाग कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली आहे. यानुसार अग्निशमन दलाचे जवान, अॅम्बुलन्स आदी घटनास्थळी निघाल्या आहेत. या इमारतीमध्ये रहिवासी राहत नव्हते. धोकादायक इमारत असल्याने रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. अर्ध्या तासापूर्वी ही इमारत कोसळली आहे. साईबाबा नगरमधील गितांजली ही इमारत आहे.

दहिहंडीमुळे सुटी असल्याने या इमारतीमध्ये रहिवासी अधिक असल्याची शक्यता आहे. 8 फायर इंजिन, 2 रेस्क्यू व्हॅन, 1 QRV, 1 कमांड पोस्ट वाहन, 3 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

तीस पस्तीस वर्षे जुनी इमारत. ए विंगची इमारत. बिल्डरसोबत करार होत होता. आज सकाळीच घरे खाली केली. बारा साडेबाराच्या सुमारास इमारत कोसळली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार