सोयगाव, दि.१९..श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शुक्रवारी रात्री दहीहंडीचा सात थर रचण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार तास हा थरार सुरू होता रात्री उशीरा दही हंडी फोडण्यात आली होती यावेळी मात्र दहीहंडीच्या उत्साहात तरुणाई थिरकली होती
जरंडी ता सोयगाव येथे शुक्रवारी रात्री उशिरा दही हंडीचा उत्साह शिगेला पोहचला होता त्यासाठी सात थर रचून राजे शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौकात थरार रंगला होता.अखेरीस योगेश हुडेकर या गोविंदाने दहीहंडी फोडली
यावेळी साईदास पवार, अमोल उभाळे, राहुल दांडगे, योगेश हुडेकर ,सत्यजित सोनवणे, गुरूदास पाटील, रामसिंग चव्हाण,गोपाल हिरे,अक्षय गुरव सतिष मोरे आनंद पवार आदी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता


छायाचित्र ओळ-,राजेछत्रपती मंडळाच्या गोविंदा कडून दही हंडीचा सात थरांचा थरार






