सोयगाव,दि.१९….संजय गांधी,श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनासाठी पुन्हा संचिका जमा करण्याच्या सूचना महसूल विभागाकडून देण्यात आलेल्या असतांना मात्र या लाभार्थ्यांनी काढलेली कागदपत्रे तलाठी सज्जांमध्ये संकलित करण्यात येत नसल्याने पुन्हा लाभार्थ्यांचा संभ्रम वाढला असून या लाभार्थ्यांना सोयगाव वारी घडत आहे.त्यामुळे शुक्रवारी सोयगावला लाभार्थ्यांची गर्दी वाढली होती…
श्रावणबाळ,संजय गांधी योजनेच्या आठ हजार चारशे लाभार्थ्यांना महसूल कडून नव्याने कागदपत्रे जमा करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहे यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र आणि हयातीचा दाखला आवश्यक असल्याचे नोटिशीत म्हटले आहे सोयगाव तालुक्यात लाभार्थ्यांनी या कागदपत्रांची जुळवाजुळव केली परंतु गावाच्या तलाठी कार्यालयात हि कागदपत्रे जमा करण्यात येत नसल्याने लाभार्थ्यांना पुन्हा सोयगाव वारी झाली असून लाभार्थ्यांना थेट सोयगावला संबंधित विभागात या कागदपत्रांची संचिका जमा करण्यासाठी जावे लागत आहे.सोयगाव तालुका हा १६० कि.मी लांबीचा आहे.त्यामुळे लाभार्थ्यांची फरफट वाढली असून कागदपत्रे काढण्यासाठी लागलेला खर्च आणि पुन्हा सोयगावला जाण्यासाठीचा खर्चाचा भुर्दंड बसत असल्याने लाभार्थ्यांना या संचिका जमा करण्यास्तही संभ्रम निर्माण झाला आहे.
उत्पन्न काढण्यासाठी लाभार्थ्यांच्या हेलपाटे-
संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन पुढे चालू ठेवण्यासाठी शासन स्तरावरून प्राप्त नवीन मार्ग्दर्स्जक सूचनांनुसार नव्याने उत्पन्न काढावे लागत आहे.यासाठी मात्र लाभार्थ्यांना गाव पातळी ते तालुकास्तरावर हेलपाटे घालावे लागत असून तालुकास्तरावरून नायब तहसीलदार यांची स्वाक्षरी घेतल्यानंतर पुन्हा गावाच्या महा-ई-सेवा केंद्रावर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची संचिका जमा करावी लागत आहे त्यानंतर मिळालेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र सोयगाव तहसील कार्यालयात जमा करावे लागत आहे.
सोयगावला लाभार्थ्यांची झुंबड –
संजय गांधी,श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची सोयगावला झुंबडी पहावयास मिळत असून मात्र संबंधित अधिकारीच टेबलावर भेटत नसल्याने पुन्हा तारांबळ होत आहे.
जाचक अटी रद्द करा–
संजय गांधी,श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घालण्यात आलेल्या उत्पन्न प्रमाणपत्राची जाचक अट शिथिल करावी अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.यासाठी वृद्धांना हेलपाटया घालाव्या लागत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






