युवा सेना संवाद यात्रेचा झंझावात धरणगाव, बंडखोरांना ही गर्दी कदापि माफ करणार नाही.दुसरी कडे जाऊन काय नवीन मिळवता आलं… मा.आदित्य साहेब ठाकरे

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी:-(योगेश पाटील) मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात युवासेना अध्यक्ष मा. आदित्यसाहेब ठाकरे यांचा झंझावाती दौरा सुरू आहे. याच निमित्ताने धरणगाव शहरात नागरिकांना व शिवसैनिकांना संवाद साधत आज ते बोलले की जे गेले त्याविषयी न बोललेले चांगले. तत्पूर्वी दोन वेळा पावसाने हजेरी लावून सुद्धा धरणगाव शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील शिवसैनिकांनी आपली जागा न सोडता आदित्य साहेबांच्या येण्याची वाट पाहत आपली निष्ठा दाखवली यालाच निष्ठावंत कार्यकर्ता असे म्हटले जाते.

त्याचप्रमाणे ज्यावेळेस आदित्य ठाकरे यांचे धरणगाव शहरात आगमन झाले त्यावेळेस जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. लगेच आदित्य ठाकरे यांनी हातात माईक घेत जनतेशी संवाद साधत सांगितले की यापुढे आपल्याकडे बरेच कामे आहेत जे गेले त्यांना जायचे होते आणि जे राहिले कट्टर निष्ठावंत आहेत माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांना मी आज सांगू इच्छितो की माझ्यावर, बाळासाहेबांवर व शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनी जे आज मला धरणगाव शहराच्या रुपाने भरभरून प्रेम दिले आहे ते कदापि विसरता जोगे नाही.

हे पण पहा एरंडोल येथील आदित्य ठाकरे यांच्या रोड शो

त्याच प्रमाणे बंडखोर आमदारांवर त्यांनी बरीचशी टीका केली. वेळ कमी असल्या कारणाने व पुढील नियोजन असल्यामुळे आदित्य साहेबांनी जनतेला संबोधून सांगितले की अशीच साथ कायमस्वरूपी शिवसेनेच्या पाठीशी व आपले आशीर्वाद असेच राहू द्या.या प्रसंगी यामध्ये पोलीस बांधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

धरणगाव शहरातील सर्व पदाधिकारी, जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ,जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडी, त्याचप्रमाणे जळगाव शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी व महापौर तसेच धरणगाव शहरातील व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील तमाम जनताजनार्दन मायबाप याप्रसंगी उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार