VIDEO : मी तेव्हा २० आमदार घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो, तह केला असता तर शिवसेना फुटली नसती: गुलाबराव पाटीलांचा मोठा खुलासा.

Spread the love

जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच गुलाबराव पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजही यु्द्धात तह करायचे. उद्धव ठाकरे यांनीदेखील तसाच तह करण्याची तयारी दाखवली असती तर आज शिवसेना फुटली नसती असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. शिंदे गटात जाणारा मी काही पहिला आमदार नव्हतो. शिवसेनेचे ३२ आमदार गेल्यानंतर शिंदे गटात (Eknath Shinde camp) जाणारा मी ३३ वा आमदार होतो. गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. त्यांना काय चाललंय, हे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावर दुरुस्ती केली असती तह केला असता तर ही वेळ आली नसती, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. ते शनिवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पहा व्हिडिओ :

शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रहार केले जात आहेत. शिंदे गटातील आमदार गद्दार कसे आहेत, हे वारंवार सांगितले जात आहे. शिंदे गटाकडूनही या टीकेचा तितक्याच जोरकसपणे प्रतिवाद केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुलाबराव पाटील यांनी बंडाच्या काळातील जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. उद्धव ठाकरे यांनी तह केला असता तर शिवसेना फुटली नसती. मी त्यांच्याकडे २० आमदार घेऊन गेलो होतो. सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती. पण उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत ऐकले नाही आणि ही वेळ आली, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. तेव्हाच तह झाला असता तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे आता राज्यभरात फिरत आहेत. ते ३२ वर्षांचे तरुण आहेत. मंत्री असताना त्यांनी राज्यात फिरावे, हेच आम्ही सांगत होतो. पण आदित्य ठाकरे आताही राज्यभरात फिरत असतील, तर परमेश्वर त्यांचं भलं करो, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.


‘आम्ही गद्दार नाही, आम्ही खुद्दारच’

यावेळी गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांनाही प्रत्युत्तर दिले. आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला. मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार