झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- शिवसेनेचे नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे संवाद यात्रे दरम्यान शहरात जंगी स्वागत करण्यात आले .यावेळी शहर व तालुक्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते शहरातून पायी रोड शो दरम्यान अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.संवाद यात्रे दरम्यान युवक व शिवसेना कार्यकर्त्यांना संवाद साधत असताना ते म्हणाले कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन शिवसेनेचा प्रचार करा आगामी काळात गद्दारांना धडा शिकवायचा आहे आता सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जा गावागावात शिवसेनेचे संघटन करा मी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे असे आवाहन त्यांनी केले कासोदा रस्त्यावर आदित्य ठाकरे यांचे फार मोठ्या वाहनांच्या ताफ्यासह आगमन झाले .
आगमन होताच असंख्य कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात ठेका धरला फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली पुष्पष्टी करण्यात आली यानंतर राम मंदिर भोईवाडा जेडीसीसी बँक भगवा चौक मेन रोड ने कार्यकर्त्यांच्या असंख्य ताप्यासह पायी चालून ठीक ठिकाणी जनते कडून स्वागत स्वीकारले जागो जागी जोरदार पुष्पष्टी करण्यात आली मुस्लिम समाजातर्फे ही स्वागत करण्यात आले माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर यांच्या कार्यालया जवळ जवळ मोठे पुष्पहार देऊन फटाक्याचे आतिषबाजीने स्वागत करण्यात आले .
हे पहा आदिंत्य ठाकरे यांच्या एरंडोल येथील रोड शो
शिवाजी महाराजयांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला दरम्यान जागो जागी पुष्पष्टी वाजंत्री व घोषणानी शहर रस्त्याने अनेक ठिकाणी संवाद यात्रा व आदित्य ठाकरे यांचे बॅनर लावण्यात आले होते तसेच मेन रस्त्यावर हे पक्षाचे झेंडे लावलेले होते शिवसेना नेते आशिष बादेकर ,संपर्क प्रमुख संजय सावंन्त,जळगावच्या महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील
जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने,जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, महानगर विभाग प्रमुख प्रशांत चौधरी,शिवसेना नेते व समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन ,जि प सदस्य नानाभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, तालुका प्रमुख वासुदेव पाटील उपतालुका प्रमुख रविंद्र चौधरी, जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,हिम्मत पाटील , पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन
माजी उपसभापती विवेक पाटील शहर प्रमुख माजी नगरसेवक कुणाल महाजन सुनील चौधरी,दशरथ चौधरी, रुपेश माळी, संजय महाजन,कृनाल पाटील, सुभाष मराठे, नितीन बिर्ला, माजी नगरसेविका आरती महाजन,प्रतिभा पाटील,हर्षाली महाजन, सतीश देवकर रवींद्र चौधरी युवा सेना शहर प्रमुख अतुल महाजन अमोल भावसार अरुण गुलाब महाजन संदीप पाटील गजानन महाजन गजानन पाटील अनिल महाजन यांचेसह इतर पदाधिकारी व शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.






