धरणगाव, (प्रतिनिधी)– सोन्याचा मुलामा असलेलं बनावट सोनं खरं भासवत सोनारालाचं फसवल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.धरणगाव शहरातील धरणी चौकातील एका सोनाराला बनावट सोनं गहाण ठेवण्याच्या नावाखाली चक्क ६ लाखाला गंडवल्याने सोन्याच्या व्यापाऱ्याची फसवणूक झाली आहे.
धरणी भागात कौस्तुभ सराफ (रा. जळगाव) यांचे रुद्र ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्याकडे धर्मेंद्र यादव आणि एक अनोळखी व्यक्तीने काही दिवसांपूर्वी एक-दोन वेळेस सोने तारण ठेवून पैसे घेऊन गेले होते. अशाप्रकारे त्यांनी विश्वास संपादन केला होता मात्र सोन्याचे नव्हे, चांदीचे दागिने देऊन फसवणूक केली आहे.
१९ ऑगस्ट रोजी सराफ यांनी धर्मेंद्र यादवकडून १८ तोळे सोने ६ लाख ९ हजार ५०० रुपयांमध्ये तारण ठेवले. परंतु जळगाव येथे दागिने यांच्या तपासून बघितले असता, त्यावर फक्त काहीअंशी सोन्याचा मुलामा असून, दागिने सोन्याचे नव्हे, तर चांदीचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे सराफ यांना आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.l
याप्रकरणी सराफ यांच्या फिर्यादीवरून धर्मेंद्र यादव व एक अनोळखी व्यक्ती अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार योगेश जोशी करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






