यावल : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चितोडा येथे तरुणाच्या हत्येची घटना आज सकाळी समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे (वय ३८) या तरुणाचा चाकूने गळा चिरून तसेच चाकूचे वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आलीय. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणि त्यांच्या सहकार्यांनी दुर्घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करत या क्रूर घटनेचा तपास सुरू केला आहे.
नेमकी घटना काय?
मनोज संतोष भंगाळे (वय 38 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोज याला रविवारी मध्यरात्री घरापासून काही अंतर लांब घेऊन जात त्याचा गळा चिरला आहे. यानंतर पोटात, पाठीवर चाकुने वार करुन ठार मारले आहे. दरम्यान, मृतदेह लपवण्यासाठी एका गाडीला बांधुन रस्त्यावरुन फरफटत नेल्याचे आढळून आले आहे.
मनोज भंगाळे हा तरुण कुणाच्या अध्यात-मध्यात पडत नसून ते शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. मारेकर्यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने त्यांना ओढून आणत रस्त्याला लागून असणार्या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचेही आढळून आले आहे
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणि त्यांच्या सहकार्यांनी दुर्घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करत या क्रूर घटनेचा तपास सुरू केला आहे. परिसरातील ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत मनोज भंगाळे याचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास केला खून
चितोडा गावातील रहिवासी असलेल्या मनोज भंगाळे या युवकाचा मृतदेह चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील चंदूशेठ चौधरी यांच्या शेतात असल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली. यावल पोलिसांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्यानंतर यावलचे पोलिस राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, गणेश ढाकणे, रोहिल गणेश, संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी व पोलिसांचा ताफा दाखल झाला.
मारेकर्यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने ओढून रस्त्याला लागून असणार्या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे. मनोज भंगाळे हा कुणाच्या अध्यात-मध्यात पडत नव्हता. सर्वांशी मनमिळावू सभावाने राहणाऱ्या मनोज भंगाळे या तरुणाच्या खुनाची घटना समजताच गावातील मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. मात्र हत्येचे कारण अद्यापही समोर आले नसून या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत मनोज भंगाळे याचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्याचे काम सुरू होते.
पोलिसांकडून पंचनामा
पंचनामा करण्यात येऊन मृतदेह यावलच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, मोनजचा खुन कोणी व का केला? याचा तपास अद्याप झाला नाही. पोलिस पुरावे गोळा करुन मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी जळगाव शहरात किरकोळ कारणावरुन अक्षय चव्हाण या 23 वर्षीय तरुणाचाही चाकूने भोसकून खून करण्यात आला. या घटनेला 24 तास उलटत नाहीत तो पर्यंत यावल तालुक्यातील चितोडा येथे मनोज भंगाळे या तरुणाचा खुन झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्हा हादरला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी यावल पोलिसांना सूचना करुन मनोजच्या मारेकऱ्यांचा लवकर शोध घ्यावा असे सांगीतले आहे.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन