एरंडोल शहर प्रतिनिधी
प्रतिनिधी । एरंडोल:- एरंडोल येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र (MITSC) तसेच दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला . करियर कट्टा या उपक्रमाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष अमित राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एन. ए. पाटील ,उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. ए . बडगुजर, ऋषिकेश संजय पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. करियर कट्टा अंतर्गत उपक्रमामध्ये युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील उपक्रम राबवले जातात.आय ये एस आपल्या भेटीला,उद्योजक आपल्या भेटीला,भारतीय संविधानाचे पारायण, वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी , फाउंडेशन कोर्स स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, ई-फायलिंग कोर्स वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत.
या उपक्रमा संबंधित महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली कु.राज्यश्री शालीग्राम पाटील (SYBA) शुभम राजेंद्र महाजन (SYBcom)या कार्यक्रमांसाठी उपस्थितांमध्ये क्रीडा विभागाचे संचालक प्रा. के. जे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. एन. एस. तायडे , प्रा. डॉ.सचिन पाटील प्रा. डॉ. एस. एल. कोतकर प्रा. डॉ. एस. एम. साळुंखे प्रा. डॉ.रेखा साळुंखे प्रा.डॉ. शर्मिला गाडगे, प्रा. उमेश गवई, प्रा. योगेश येनडाईत प्रा. राहुल पाटील, प्रा. सुरज वसावे, प्रा. महेंद्र शिरसाट प्रा. सागर पाटील, प्रा. उमेश सूर्यवंशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. बालाजी पवार ( स्पर्धा परीक्षा समन्वयक ) यांनी केले .
तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रामा वानखेडे यांनी केले . या कार्यक्रमासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील कला , वाणिज्य आणि विज्ञान विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा सागर विसपुते , प्रा .अतुल पाटील यांनी परिश्रम घेतले , महाविदयालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली .