झुंजार । प्रतिनिधी
पारोळा :- श्री शनी मंदिर संस्थानच्या माध्यमातून माजी खासदार ए टी पाटील यांनी आयोजित खुल्या कुस्ती स्पर्धा मध्ये शेवटची मानाची कुस्ती खेडी खेडगाव ता चाळीसगावचा मल्ल गोपाल जाणे याने सिल्लोडचा मल्ल इम्रान शेख याला चित करून विजय संपादन केला. त्याचा विजयाने समर्थकांनी एकाच जल्लोष केला. विजयी उमेदवाराला 7000 रुपये रोख बक्षीस माजी खासदार ए टी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
शहरात यापूर्वी शनी मंदिर संस्थान वतीने 25 वर्ष पासून कुस्त्यांचे स्पर्धा आयोजित करण्यात येत होत्या मध्यतरी त्यात खंड पडला होता. यावर्षी माजी खासदार पाटील यांनी ती परंपरा पुन्हा सुरू ठेवण्याचा मनोदय व्यक्त करून या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव, माजी खासदार ए टी पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या हस्ते व उपस्थिती मध्ये आखाडा पूजन करण्यात आले.
संपूर्ण खानदेश व सिल्लोड च्या एकूण दोनशे सव्वा दोनशे मल्लानी प्रचंड सहभाग घेऊन स्पर्धात जल्लोष भरला होता. सर्व स्पर्धकांना यावेळी रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. कुस्ती पंच म्हणून प्रा संजय भावसार, विक्रम पाटील, महादू चौधरी, राजेंद्र पाटील, आदींनी काम पाहिले. तर यशस्वीसाठी भावडू राजपूत, विश्वास चौधरी, कैलास पाटील, मुकुंदा चौधरी, संतोष पाटील, भिकन पाटील, अरुण भिवंडी, अतुल मोरे, जितेंद्र चौधरी, धीरज महाजन, भीमराव जावळे, संजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.
मुलीने दिली मुलाला कडवी झुंज
पुरुष पैलवान सोबत या स्पर्धेत मुलींनी देखील सहभाग घेतला होता. एरंडोल च्या दोन मुलींनी कुस्ती खेळून प्रेक्षकांचे दाद मिळवली तर गोंडगाव ता भडगाव येथील सुनामीका पाटील या मुलीने दीपक कोकांदे या मुला सोबत कुस्ती खेळून कडवी झुंज दिली. शेवटी या दोघांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

माजी खासदार पाटील यांनी या मुलीला 500 रुपयांचे बक्षीस देऊन तिला प्रोत्साहन दिले. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला.