प्रतिनिधी – संतोष कदम.
भादलवाडी :- (ता. इंदापूर ) भादलवाडी येथे पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामकृष्ण महादेव येकाळे [सर ] यांच्या शेतात रविवारी दि 21-8-2022 रोजी शिवार फेरी संपन्न झाली.
या शिवार फेरी मध्ये राज्यस्थान , उत्तर प्रदेश, बिहार, मध्ये प्रदेश, गुजरात , कर्नाटक इत्यादी राज्यातील शेतकऱ्यांसह नेपाळ व बांगलादेश येथील शेतकरी उपस्थित होते. या शिवार फेरीमध्ये 500 पेक्षा जास्त स्त्री व पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
भादलवाडी येथे श्री रामकृष्ण महादेव येकाळे [सर ] हे तीन वर्षांपासून डॉ सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञानाने शेती करत आहेत.त्यासाठी जीवामृत, आच्छादन, वापसा , दशपर्णी, अर्क निमास्त्र यांचा वापर करतात.
शेतात 550 पेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पतींची लागवड केलेली आहे.

त्यामध्ये 150 प्रकारचे देशी वृक्ष , 100 प्रकारची फुलझाडे, 100 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती, 201 प्रकारची फळझाडे आहेत. शेतामध्ये लागवड केलेले वृक्ष देशभरातून जमा केलेली आहेत. त्यामध्ये अजान वृक्ष ,बोधी वृक्ष,कौशी, उंडी, दक्षिण मोट, रक्तरोहीडा ,भुत्या ,हळद, काटे सावर,काळा व पांढरा पळस ,आष्टा,अर्जुन ,बाबळ, वारस, पुत्रं जीवा,बुच पांगारा ,गोरख चिंच, कोकम, पपनस,आंबाडा,भिमसेनी कापूर ,लाल आवळा,कुंकु फळ, फालसा ,हिरडा, बेहडा, इत्यादी बरोबर आंब्याच्या 42जाती आहेत.

यावेळी पद्मश्री सुभाष पाळेकर म्हणाले की भादलवाडी येथे श्री रामकृष्ण महादेव येकाळे (सर) यांच्या शेतावर S.P.K चे पहीले अभ्यास केंद्र सुरू होईल. हे केंद्र देशभरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श असेल. कार्यकाचे प्रस्ताविक श्री रामकृष्ण येकाळे ( सर) यांनी केले. आभार धीरज जाधव यांनी मानले तर सुत्रसंचलन श्री दत्तात्रेय जाधव यांनी केले.
यावेळी उपस्थित श्री वासुदेव ( नाना) काळे (किसान मोर्चा भाजपा), श्री महेश कन्हेरकर ( अध्यक्ष स्पंदन ) , श्री शिवाजी कन्हेरकर (सरपंच भादववाडी)श्री प्रविण पाटील (माजी सरपंच भादलवाडी ) श्री सोमनाथ कुताळ , यांसह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी ,शिक्षक उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






