सोयगाव, दि.२३…जनतेची कामे करतांना विरोधकांची जिव्हारी येत असून विरोधकांनी व सत्ताधाऱ्यांनी थेट जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना हर्षवर्धन जाधव यांची आलेली जनतेची कामे न करण्याचा दबाव अधिकाऱ्यांवर टाकत असल्याचा गौप्यस्फोट मंगळवारी ईशा जाधव यांनी सोयगावला केला आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे.ईशा जाधव मंगळवारी वृद्ध,विधवा महिलांना संजय गांधी,श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सोयगाव तहसील कार्यकायसमोर सत्याग्रह आंदोलन साठी आल्या होत्या,यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे
सोयगाव तहसिल कार्यालयासमोर मंगळवारी ईशा जाधव,माजी आमदार तेजस्विनी जाधव,यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या आंदोलनात वृद्ध,विधवा महिलांना उत्पन्न प्रमाणपत्र न मिळणे,त्यांच्या संजय गांधी,श्रावणबाळ योजनेच्या संचिका पात्र न करणे,अंध,अपंगांची होणारी याकामी हेळसांड थांबविणे,तलाठी सज्जेवर उत्पन्न प्रमाणपत्रासाठी तलाठी न भेटणे, आदी मागण्यांसाठी माजी आमदार तेजस्विनी जाधव,ईशा जाधव यांनी दोन तास सत्याग्रह आंदोलन केले व मागण्यांचे निवेदन तहसीलदार रमेश जसवंत यांना दिले
यावेंली तहसीलदार रमेश जसवंत यांनी गुरुवारी दि.२५ संजय गांधी,श्रावणबाळ योजनेचे नवीन लाभार्थी निवड बैठक असून या बैठकीत पात्र संचिकमधील लाभार्थ्यांची संचिका तपासून पात्र करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. सत्याग्रह आंदोलनात माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी मराठवाड्यातील वृद्ध महिलांची अवस्था खूप दयनीय झाल्याचे सांगून, राज्यातील अधिकाऱ्यांनी या वृद्ध,विधवा आणि अपंग महिलांसाठीच आपल्या कुटुंबातील समजून त्यांच्या कामाचा निपटारा करावा असे सांगितले.
अधिकारी व कर्मचारी सध्या मस्तवाल झाले आहेत त्यांना महिलांची अद्याप किंमतच समजली नसून मराठवाड्यातील महिलांच्या तोंडावरील सोनेरी क्षण अधिकाऱ्यांच्या इस्त्रीच्या कपड्यात गेले असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे.यावेळी तहसिल कार्यालयाकडुन मिळालेल्या आश्वासना नंतर सत्याग्रह आंदोलन माघार घेण्यात आले स्व.रायभान जाधव आघाडीचे डिगंबर जाधव,युवराज जाधव,भावडू जाधव,आदींनी पुढाकार घेतला होता.

छायाचित्र ओळ-माजी आमदार तेजस्विनी जाधव सत्याग्रह आंदोलनात सोबत ईशा जाधव,व इतर महिला, दुसऱ्या छायाचित्रात तहसीलदार रमेश जसवंत यांना निवेदन देताना, ईशा जाधव व इतर






