झुंजार । प्रतिनिधी एरंडोल-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तहसीलदार कार्यालयामार्फत आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सात दिवस सुरु असलेल्या विविध कार्यक्रमांचा समारोप व बक्षिस वाटप तहसीलदार कार्यालयात करण्यात आला.प्रांताधिकारी विनय गोसावी अध्यक्षस्थानी होते.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तहसीलदार कार्यालयाच्यावतीने हुतात्मा स्मारक भेट,फरकांडे येथील झुलत्या मनो-यास भेट,
विद्यार्थ्यांची प्रभात फेरी,तिरंगा रँली,सामुदायिक पर्यावरण संवर्धन शपथ, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आठ दिवस आयोजन करण्यात आले होते.तहसील कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध विद्यालायांमधील हजारो विद्यार्थी भर पावसात सहभागी झाले होते.कार्यक्रमाचा समारोप उत्साहात करण्यात आला.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजान्कार्ण्यात आले होते.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी महसूल प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे सांगितले.
यावेळी स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वाटप करण्यात आले.तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.निवासी नायब तहसीलदार किशोर माळी यांनी आभार मानले.कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,गटविकास अधिकारी जाधव,नायब तहसीलदार दिलीप पाटील यांचेसह शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,महसूल कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी-एरंडोल येथील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी द्वीपप्र्जवळण करतांना तहसीलदार सुचिता चव्हाण त्यांचेसोबत प्रांताधिकारी विनय गोसावी व अधिकारी.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.





