दिंडी तुन सामाजिक जागृतीचा संदेश.
पिंप्री खु ता धरणगाव – प्रतिनिधी
धरणगाव :- सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते.संत नामदेव, नरहरी सोनार, परिसा भागवत. जनाबाई, चोखामेळा या संतांप्रमाणे संत सेनांचे कोठेही स्वतंत्र, सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. समकालीन संतांनी सेना महाराजांचा एक विठ्ठलाचे निःसीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून उल्लेख केला आहे. (संत जनाबाई) शिखांचा धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात संत सेनांच्या एका पदाचा समावेश केला आहे. त्यांच्या अनेक उत्तरकालीन संतांनी, हिंदी-मराठी संशोधकांनी त्यांच्या काव्याचा अभ्यास मांडलेला आहे.

प्रसिद्ध संत सेना महाराज व्यवसायाने न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग :
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू । चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पिंप्री येथील समाज बांधब व भजनी मंडळ यांच्या माध्यमातून गावातुन दिंडी चे आयोजन करण्यात आले होते . प्रसंगी नाभिक समाज पिंप्री चे अध्यक्ष राजेंद्र बोरसे, सर्व सदस्य व समाज बांधव उपस्थित होते . तसेच अरुण चित्ते, नाना सूर्यवंशी, रमण बोरसे, बापू महाले, देविदास सोनगीरे, संतोष सोनावणे, संतोष सोनगीरे, जयेश सोनगीरे , राजेंद्र सोनवणे, हिम्मत सोनवणे, एकनाथ सोनगीरे, नवल, सोनगीरे गजानन बोरसे, निलेश सोनगीरे , दादा निकम आणि समस्त नाभिक समाज बांधव पिंप्री आदी उपस्थित होते .

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






