इस्कॉन तर्फ एरंडोलवासियांसाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
सालाबादप्रमाणे इस्कॉन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे दि. २२ ते २५ ऑगस्ट सांयकाळी ७ ते ९ यावेळेत हिमालय मंगल कार्यालय एरंडोल येथे आयोजन करण्यात आलेले

आहे. इस्कॉन तर्फे महोत्सवाचे हे सहावे वर्ष असुन उद्घाटन प्रसंगी दि. २२.०८.२०१२ रोजी आत्मा व शरीर यांची गरज तसेच जीवनातील आध्यात्मिकतेचे महत्व या विषयावर जगन्नाथयात्रा दास इस्कॉन, पाचोरा यांनी सविस्तर कथन केले. पुढील तीन दिवस दि.२३, २४, २५/०८/२०२२ कालावधीत श्री. जानकीनाथदास

ब्रम्हचारी इस्कॉन, नासिक यांच्याव्दारा कथामृताचा लाभ मिळणार असून दि.२५.०८.२०२२ रोजी अभिषेक, किर्तन, १०८ भोगार्पणाचे विशेष आयोजन करण्यात आलेले आहे. तरी कथेसोबत दररोज महाप्रसादाचाही लाभ घेण्याबाबत इस्कॉन तर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.

टीम झुंजार